लोणी बुद्रुकमध्ये मृत कावळा आढळला

नमुना पुण्याला पाठविला
लोणी बुद्रुकमध्ये मृत कावळा आढळला

लोणी |वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे मृत कावळा आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली असून मृत कावळ्याचा नमुना स्वाईन फ्लूच्या तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला आहे.

लोणी बुद्रुक गावातील सादतपूर रस्त्यालगत जालिंदर रामनाथ विखे यांचे राहते घर आहे. घराजवळ भरपूर मोठी झाडी असल्याने कावळ्यांसह अनेक पक्षी येथे वास्तव्य करतात. मंगळवारी रात्री जालिंदर विखे यांना एका झाडाखाली एक कावळा मृतावस्थेत दिसून आला. सध्या स्वाइन फ्लूने कावळे व अनेक पक्षी मृत होत असल्याने त्यांनी लोणीचे शासकीय पशुवैद्यक डॉ. दशरथ दिघे व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.

बुधवारी सकाळी हे दोघे घटनास्थळी गेले. मृत कावळा बर्फाच्या पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करून स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पुढील तपासणीसाठी त्याचा नमुना भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे.

कावळा मृत आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे. जर त्याचा स्वाइन फ्ल्यू अहवाल पॉझिटिव्ह आला तर शासन काय निर्णय करते हे महत्वाचे आहे. परिसरात अजून स्वाइन फ्ल्यू आढळलेला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com