लोणीत गंठणचोर पकडले; एक जखमी

चोरी
चोरी

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील म्हस्के गल्लीतील घरासमोर बसलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून पळालेल्या आरोपींच्या दुचाकीला अपघात झाल्याने ते पोलिसांच्या हाती लागले. याबाबत सौ. ज्योत्स्ना बापूसाहेब कांडेकर, रा. म्हस्के गल्ली,लोणी बुद्रुक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

सोमवारी दुपारच्या वेळी त्या आपल्या राहत्या घराच्या ओट्यावर शेजारच्या महिलेसोबत गप्पा मारत असताना काळ्या रंगाचा पल्सर दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यातील एकाने पत्ता विचारण्याचा बहाणा करून ज्योत्स्ना यांच्या गळ्यातील बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडून दुचाकीवरून पळ काढला. स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली.

दरम्यान लोणी-बाभळेश्वर रस्त्याने भरधाव वेगाने आरोपी जात असताना कन्या शाळेजवळील रस्ता दुभाजकाला त्यांच्या दूचाकीची धडक बसून ते रस्त्यावर पडले. आरोपी बल्ली उर्फ बलराज भाऊसाहेब साळवी व जाफर बिबन सय्यद दोघे रा. शिंगवे नाईक ता.नगर हे पोलिसांच्या हाती लागले. यातील बलराज साळवी जखमी झाल्याने त्याला प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसर्‍याला पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत.सपोनि समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com