corona
corona
सार्वमत

लोणीत नव्याने सहा जण करोना बाधित

हसनापूरमध्ये एकाला संसर्ग

Arvind Arkhade

लोणी |वार्ताहर|Loni

शनिवारी लोणी खुर्द गावात सहा जण बाधित आढळून आले तर शेजारच्या हसनापूर मध्येही एका व्यक्तीला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. लोणीतील बाधितांचा आकडा 32 वर पोहचला आहे.

गेल्या आठ दिवसात करोनाने चांगलेच पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दररोज निघणारे नवीन बाधित चिंतेचा विषय बनला आहे. शनिवारी लोणी खुर्द गावातील प्रवरानगर भागात चार जण करोना बाधित आढळून आले.

दोन कुटुंबातील प्रत्येकी तीन आणि एक व्यक्ती बाधित निघाली. त्याचबरोबर पिंप्री रस्त्यावरील त्या बाधित पोलीस कर्मचार्‍याचा मुलगा बाधित असल्याचे तपासणीत दिसून आले. तर सप्तशृंगी नगर मधील एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी सहा व्यक्ती बाधित आढळल्याने लोणी खुर्द व बुद्रुक गावातील बाधितांची संख्या 32 वर पोहचली आहे.

लोणी जवळच्या हसनापूर गावातील भाने वस्ती भागात एक व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला. या भागात काही दिवसांपूर्वी बाधित व्यक्ती आढळून आले होते. त्याच बरोबर गावठाण भागातही एक व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com