लोणी खुर्द व बुद्रुकमध्ये एकूण 6 संक्रमित

लोणी खुर्द व बुद्रुकमध्ये एकूण 6 संक्रमित

लोणी|वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात गुरुवारी पाच जण तर बुद्रुकमध्ये एक असे सहा व्यक्ती करोना बाधित आढळली. बाधितांमध्ये पोलीस आणि परीचारिकेचा समावेश आहे.

बुधवारी लोणी खुर्द गावात एकाच कुटुंबातील सहाजण बाधित निघाले होते. एकाचा मृत्यूही झाला होता. त्याअगोदर लोणी बुद्रुक गावात एकाच इमारतीत बाराजण बाधित आढळले होते. प्रशासन सतर्क झाले असताना गुरुवारी प्रवरानगर येथील परिचारिका, तिचे सासरे, भाऊ, बहीण करोना बाधित आढळून आले. त्यासोबतच आश्वि येथे नियुक्तीवर असलेला व लोणी खुर्द गावातील पिंप्री निर्मळ रस्त्यावर राहणारा पोलीस कर्मचारी व त्याची मुलगी बाधित आढळून आली.

पोलीस कर्मचार्‍यांच्या मुलीने लोणी बुद्रुक गावातील महिला टेलरकडे कपडे शिवण्यासाठी दिले होते. बाधित मुलीच्या कपड्यांची मापं घेतल्याने टेलर महिलाही काल बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. लोणीमध्ये करोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन गुरुवारी शिर्डीचे पोलीस सोमनाथ वाकचौरे स्वतः तात्काळ कृती दलासह लोणीत फौजफाटा घेऊन हजर झाले.

लोणी पोलीस आणि कृती दलाच्या कर्मचार्‍यांनी वाहतूक नियंत्रण करीत मास्क न वापरणारे,वाहनांची कागदपत्र व वाहन चालक परवाना नसणारांविरुद्ध कारवाई केली. रस्त्यालगतच्या ज्या दुकानदारांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे वर्तन केले त्यांना कडक समज देऊन उद्यापासून रस्त्याच्या भागात कोणतीही वस्तू दिसल्यास कारवाईचे संकेत दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com