'फऱ्या व लंपी'चा वाढता प्रादुर्भाव; लोणीचा जनावरांचा आठवडे बाजार राहणार बंद

'फऱ्या व लंपी'चा वाढता प्रादुर्भाव; लोणीचा जनावरांचा आठवडे बाजार राहणार बंद

राहाता | तालुका प्रतिनिधी

फऱ्या व लंपी रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोणी येथील उद्याचा जनावरे बाजार बंद राहणार आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राहाता बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक आर. एम. खेडकर यांनी दिली. गाय, बैल, म्हैस या जनवारांचा बाजार ३१ ऑगस्ट पासून बंद ठेवण्यात आला. परंतु शेळी, मेंढी बाजार नियमित सुरु राहील.

तसेच सर्व पशु पालकांनी आपल्या जनावरांना तात्काळ फऱ्या व लंपी या आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासक खेडकर व बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी केले आहे.

लम्पी आजाराची लक्षणे

या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. या आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषत: डोके, मान, पाय, कास या ठिकाणी गाठी येतात, तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोळ्यामध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. पायास सूज येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com