लोणीजवळ बोलेरो आणि कारचा भीषण अपघात; चार जण जखमी

लोणीजवळ बोलेरो आणि कारचा भीषण अपघात; चार जण जखमी

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात तळेगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी बोलेरो आणि हुंडाई कारच्या भीषण अपघातात लोणीतील चार जण जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

याबाबत लोणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोणी बुद्रुक येथील हॉटेल साईछत्रचे संचालक शैणेश गणपत भोसले व त्यांचा गाडी चालक दादाभाई मणियार हे महेंद्रा बोलेरो एमएच- 37 ए 3848 मधून तळेगाव रस्त्याने लोणीकडे येत होते. लोणी खुर्द गावच्या स्मशानभूमीजवळ लोणी बुद्रुक गावाकडे जाण्यासाठी त्यांनी गाडीचा वेग कमी केला आणि तेवढ्यात पाठीमागून हुंडाई कार एमएच 17 एझेड भरधाव वेगात येऊन बोलेरोवर धडकली.

कारचा वेग इतका होता की, बोलेरो गाडी उलटली आणि दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सिनेमातील दृश्याप्रमाणे हा अपघात घडला. बोलेरोतील भोसले आणि मणियार यांना दरवाजाच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले तर कार मधील प्रा. सुधाकर निकम व त्यांचा मुलगा विवेक यांना बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. निकम पिता-पुत्र जबर जखमी झाले. चारही जखमींना प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शैणेश भोसले आणि दादाभाई मणियार यांची प्रकृती स्थिर असून जखमी निकम पिता पुत्रांना उपचारासाठी कोपरगाव येथे हलवण्यात आले. पोलिसांनी हुंडाई चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com