सलगच्या सुट्यांमुळे भाविकांच्या गर्दीने फुलली साईनगरी, पाहा फोटो

सलगच्या सुट्यांमुळे भाविकांच्या गर्दीने फुलली साईनगरी, पाहा फोटो

शिर्डी | शहर प्रतिनिधी

महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे व विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्यामुळे शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

वाढलेला उकाडा तसेच माध्यमिक विभागाच्या परीक्षा यामुळे भाविकांची संख्या रोडावण्याची चिन्हे होती. शनिवार, रविवारला जोडून गुडफ्रायडे आल्याने सलग सुट्या आल्या आहे.

तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. त्यामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी झाली आहे. दरम्यान येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम सोयी सुखसुविधा देण्यासाठी साईसंस्थान प्रशासन सज्ज आहे.

गर्दीत भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी जातांना एकोप्याने जावे, स्वताबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांची देखील काळजी घ्यावी. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास साईसंस्थानच्या सुरक्षा कर्मचारी तसेच प्रशासनास कळवावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केली आहे.

दरम्यान ९ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय उत्सवात सुमारे ३ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

Related Stories

No stories found.