स्व. घुले पाटलांनी सहकार क्षेत्रातील संतत्व प्राप्त केले

स्व. घुले पाटलांनी सहकार क्षेत्रातील संतत्व प्राप्त केले

स्मृतीदिन कार्यक्रमप्रसंगी उद्धव महाराज मंडलिक यांचे गौरवोद्गार

भेंडा (वार्ताहर) / Bhena - लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी (Loknete Marutrao Ghule Patil) सहकार क्षेत्रातील संतत्व प्राप्त केले आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र नेवासा (newasa) येथील तुकाराम महाराज मंदिराचे विश्‍वस्त उद्धव महाराज मंडलीक (Uddhav Maharaj Mandlik) यांनी केले.

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्‍वर उद्योग समूहाचे वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.

प्रारंभी श्रीक्षेत्र नेवासा येथील तुकाराम महाराज मंदिराचे विश्‍वस्त उद्धव महाराज मंडलिक, ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे विश्‍वस्त शिवाजी महाराज देशमुख, कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, अ‍ॅड. देसाई देशमुख, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, शिवशंकर राजळे, उदयन गडाख, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, अंकुश महाराज कादे, रामनाथ महाराज काळेगावकर आदींनी स्व. घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

ज्ञानेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त शिवाजी महाराज देशमुख म्हणाले, साहेबांनी समाजासाठी आपले जीवन व्यतीत केले. धरणग्रस्तांचे जीवन आनंदी करण्याचे काम त्यांनी केले. अनेकांचे संसार फुलविण्याचे काम त्यांनी केले.

यानिमित्त आळंदी येथील किशोर महाराज दिवटे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ज्ञानेश्‍वर पवार, मच्छिंद्र महाराज भोसले, मुळा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले, संचालक काकासाहेब शिंदे, पंडित भोसले, बबनराव भुसारी, जनार्दन कदम, शिवाजीराव दसपुते, दिलीपराव लांडे, अरुणराव लांडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,दादासाहेब शेळके, नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, पंचायत सदस्य अजित मुरकुटे, संजय फडके, रामभाऊ जगताप, दिलीप पवार, हनुमंतराव वाकचौरे, सुरेश डिके, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव धस, शिवाजी गवळी, अनिल मडके, तुकाराम मिसाळ, बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजीराव शिंदे, अशोकराव मिसाळ, दादा गंडाळ, गणेश गव्हाणे, अशोक वायकर, शिवाजी कोलते, उत्तमराव वाबळे, संजय कोळगे, अरुण देशमुख, मच्छिंद्र महाराज भोसले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, निकम सावकार,अड.अण्णासाहेब अंबाडे, एकनाथ भुजबळ, नंदकुमार पाटील, शिवाजीराव पाठक, माणिकराव बुधवंत, बापूसाहेब फुंदे, उपअभियंता प्रवीण दहातोंडे, संजय घुले, गोरक्षनाथ कापसे, भानुदास कावरे, भाऊसाहेब चौधरी, मोहनराव देशमुख, वृद्धेश्‍वर कारखान्याचे संचालक डॉ. यशवंत गवळी, अशोक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिगंबर शिंदे, श्रीरंग हारदे, अमोल अभंग, एकनाथ कावरे, डॉ.अशोकराव ढगे, एम.एम.शिंदे, कडूभाऊ दळवी, बाळासाहेब नवले, तुकाराम काळे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com