GST कर प्रणालीत नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून 'ज्ञानेश्वर'चा सन्मान

GST कर प्रणालीत नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून 'ज्ञानेश्वर'चा सन्मान

भेंडा l वार्ताहर l Bhenda

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (Loknete Marutrao Ghule Patil Dnyaneshwar Sahakari Sugar Factory) सन 2020-21 या आर्थिक वर्षात 31 मार्च 2021 अखेर जीएसटी कर प्रणालीत (GST tax system) नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केल्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे (Ministry of Finance, Government of India)....

GST कर प्रणालीत नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून 'ज्ञानेश्वर'चा सन्मान
इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रस्तारोको

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला सर्टिफिकेट ऑफ अप्रेसिएशन (Certificate of Appreciation) प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान केला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एम.अजित कुमार (Central Board of Indirect Taxes and Customs M. Ajit Kumar) यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (Former MLA Narendra Ghule Patil) यांनी दिली.

केंद्र शासनाने (Central Govt) 2017 पासून जीएसटी कर प्रणाली (GST tax system) लागू केली तेंव्हा पासून ते 31 मार्च 2021 पर्यंत लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याने ((Loknete Marutrao Ghule Patil Dnyaneshwar Sahakari Sugar Factory)) अत्यंत तत्परतेने व नियमित जीएसटी भरणा करून केंद्र शासनास सहकार्य केले आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला सर्टिफिकेट ऑफ अप्रेसिएशन प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान केला आहे.

GST कर प्रणालीत नियमित भरणा केल्याबद्दल केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून 'ज्ञानेश्वर'चा सन्मान
शिवसेना आ.संजय गायकवाडांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

नियमित जीएसटी वेळेत भरणा करणे कामी लेखापाल शैलेंद्र जैस्वाल (Accountant Shailendra Jaiswal), कारखान्याचे सिनिअर अकाउंटंट नामदेव शिंदे (Senior Accountant Namdev Shinde) व असिस्टंट अकाउंटंट रमेश शिंदे (Assistant Accountant Ramesh Shinde) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या उत्कृष्ठ कामाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (Former MLA Narendra Ghule Patil), संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील (Director Former MLA Chandrasekhar Ghule Patil), उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग (Former MLA Pandurang Abhang), तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील (Dr. Kshitij Ghule Patil), कार्यकारी संचालक अनिल शेवाळे (Executive Director Anil Shewale), सचिव रवींद्र मोटे (Ravindra Mote), आप्पासाहेब खरड (Appasaheb Kharad), चीफ अकाउंटंट रामनाथ गरड (Chief Accountant Ramnath Garad), शेंडगे (Shendge) यांनी अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com