नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील भानसहिवरा येथील लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या वतीने करोना प्रतिबंधक कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दलचे कोरोनायोद्धे व विशेष आरोग्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून

सोनई येथील जेष्ठ पत्रकार व एकता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले यांना करोना योद्धा तर डाॅ.योगेश साळुंके (विशेष आरोग्य सेवा), ॠषिकेश बोरुडे (कार्यालयीन अधिक्षक, संगमनेर), सतिष देसाई (पोलिस कर्मचारी), शंकर मलदोडे(आरोग्य सेवक) हे पुरस्काराचे अन्य मानकरी ठरले असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र किर्तने यांनी दिली आहे.

भानसहिवरा येथील श्रीराम विद्यालयात शनिवार दि.12 डिसेंबर या स्व.मुंडे यांच्या जन्मदिवशी पुरस्कार वितरण व शालेय विद्यार्थ्यांना करोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक साहित्याचे वाटप होणार आहे. शनिवार दि.12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भानस हिवरे येथे शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.सुदर्शन मुंडे यांच्या हस्ते व नेवासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी, जलमित्र पत्रकार सुखदेव फुलारी, श्रीराम हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. पालवे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब ढवाण यांचे प्रमुख उपस्थित पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठाणच्या वतीने दत्ता गव्हाणे, सुनिल सानप, रावसाहेब घुले, सुयोग सांगळे, सावळेराम वनवे, मंगेश वनवे आदींनी केले आहे