लोकनेते बाळासाहेब थोरात पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांना जीवनगौरव पुरस्कार
लोकनेते बाळासाहेब थोरात पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यासह ठाणे, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात अतिदुर्गम भागात गुणवत्तेने व प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्‍या 25 शिक्षकांचा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील केबी दादा सभागृहात जाणीव फाउंडेशनच्यावतीने या पुरस्कारांचे वितरण नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी जि. प. सदस्य अजय फटांगरे, फादर विल्सन परेरा, प्रा. बाबा खरात, प्राचार्य हरिभाऊ दिघे, शिक्षण अधिकारी सुवर्णा फटांगरे, आदर्श शिक्षक रावसाहेब रोहकले गुरुजी, बबनराव कुर्‍हाडे, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, उपाध्यक्ष संदीप काकड, समन्वयक अंतोन मिसाळ, अशोक हजारे, जयराम ढेरंगे आदी उपस्थित होते.

सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, शिक्षण हे समाज बदलवण्याचे प्रभावी माध्यम असून या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे काम करणार्‍या या गुणवंत शिक्षकांच्या कामाचा जाणीव फाउंडेशनने केलेल्या सन्मान हा शिक्षकांच्या जीवनात नक्कीच मोठी ऊर्जा देणारा ठरणार आहे.

कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लहान मुलांच्या जीवनावर शिक्षकांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. सध्याचे शिक्षक हे अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवीन पहाट निर्माण करत आहेत. ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे खर्‍या अर्थाने ईश्वराचे कार्य आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, बाबा खरात, रोहकले गुरुजी, यांनीही मनोगती व्यक्त केली.

याप्रसंगी अभिजीत देशमुख (सिन्नर), गणपत हजारे (साकूर) राजेंद्र पाचपुते (खेड जिल्हा पुणे) बिस्मिल्लाह जैनुद्दीन शेख (संगमनेर), ज्ञानेश्वर सोनवणे (अकोले), डॉ. आतिश कापसे (बोटा), दत्तात्रय जठार (केळेवाडी), वैभव सांगळे (अहमदनगर), स्वप्ना वाघमारे (अहमदनगर ), सौ. मालू आभाळे (मुंजेवाडी), सौ. प्रीती ठोंबरे (आंबी दुमाला), गणेश कहांडळ (उक्कडगाव ता.कोपरगाव), देवेश सांगळे (तळवाडा शहापूर जि. ठाणे), सतीश गोरडे (सिन्नर), शिवाजी चत्तर (पळसखेडे), सोमनाथ घुले (पिंपळगाव माथा), प्राचार्य हरिभाऊ दिघे (तळेगाव दिघे), दत्तात्रय हेंद्रे (राहुरी), चांगदेव काकडे (गागरे वस्ती), दत्तू थिटे (डोळासणे), प्रकाश पारखे (सिद्धार्थ विद्यालय), गुलशन जमादार (साकूर), आनंदा मधे (बोटा), सत्यानंद कसाब (वडगावपान), मच्छिंद्र मंडलिक (निमोण), सौ. सुनीता गडदे (चिपाची ठाकरवाडी), राजू आव्हाड (सुकेवाडी), भाऊसाहेब यादव (ज्ञानमाता विद्यालय), राजेश वाकचौरे (संगमनेर खुर्द) तर प्राध्यापक बाबा खरात यांना आदिवासी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जाणीव फाउंडेशनचे भाऊसाहेब काकड, राजेंद्र गोडगे, रमेश रुपवते, पोपट दिघे, बाळासाहेब मुर्तडक, सुनील अभियेकर, सुधीर गडाख, बाळासाहेब कांडेकर, वसंत बोडखे, अशोकराव साळवे, कुंडलिक मेंढे, बाळासाहेब काकड, हर्षल बाळासाहेब हेंद्रे, निकिता बाळासाहेब हेंद्रे, प्रकाश पारखे, अशोक कांडेकर, सत्यानंद कसाब यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार अशोक कांडेकर यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com