लोकअदालतीमध्ये कोटीची वसुली

मालमत्ता थकबाकी भरण्याकडे नगरकरांची पाठ
लोकअदालतीमध्ये कोटीची वसुली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सूट देऊनही थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. सवलत काळात वसुलीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लोक अदालतीमध्येही 75 टक्के सवलत दिली जात आहे. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. रविवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये केवळ एक कोटी सात लाख रुपयांची वसुली झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या कराच्या थकबाकीमध्ये वाढ होत आहे. चालू वर्षात केवळ 42.83 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तर अद्यापही 180.40 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वर्षभरातील वसुलीचे प्रमाण अवघे 19.19 टक्के आहे. मागील काही महिन्यात मनपा प्रशासनाने थकबाकीदारांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रभाग अधिकार्‍यांमार्फत चार-पाच थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली.

मात्र, त्यानंतर तात्काळ ही मोहीम गुंडाळण्यात आली. थकबाकीदारांना आकर्षित करण्यासाठी मनपाने शास्तीमध्ये माफी दिली होती. मात्र त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता लोक अदालतीमध्ये थकबाकीची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जात आहेत. मात्र, त्यातूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com