लोहगावच्या शेतकर्‍याच्या आणखी 3 गायी दगावल्या

दोन अत्यवस्थ || विषबाधेने दगावलेल्या गायींची संख्या 8 वर
लोहगावच्या शेतकर्‍याच्या आणखी 
3 गायी दगावल्या

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी रोहीदास जनार्धन ढेरे यांच्या गोठ्यातील पाच गायी विषबाधा होवून शुक्रवारी दगावल्यानंतर काल शनिवारी आणखी 3 गायी दगावल्याने एकूण दगावलेल्या गायींची संख्या 8 झाली असून दोन गायी अत्यवस्थ अवस्थेत आहेत.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी काल भेट देवून पंचनामा व पुढील उपचार बाबत मार्गदर्शन केले.

लोहगाव-पानसवाडी रस्त्यावर राहत असलेल्या ढेरे यांच्या गोठ्यात पस्तीस दुभत्या गाई होत्या. तीन दिवसापुर्वी ऊसाच्या चार्‍यातून विषबाधा झाल्याने पाच गायी दगावल्या होत्या. शुक्रवारी दोन तर शनिवारी तीन गाया दगावल्या आहेत. सध्या दोन गाया अत्यवस्थ असून घोडेगावचे सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन पालवे व पथक उपचार करीत आहेत.

लोहगावात घडलेल्या या घटनेने पशुपालक रोहीदास ढेरे यांनी धसका घेवून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संपुर्ण कुटूंबातील सदस्य नुकसानीने ढसाढसा रडत आहेत. अल्पभूधारक पशुपालक शेतकर्‍यास शासनाने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com