जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण

पिस्तुलाचा धाक दाखवून रक्कम लुटली
जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे आवाजीनाथ मंदीरासमोर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवून एकाचे हात बांधून 3 लाख 50 हजार रुपये खंडणीची मागणी करून फिर्यादीच्या खिशातील 11 हजार 500 रुपये लुटण्यात आले. त्याबरोबर 7 हजार किमतीचा मोबाईल तसेच 30 हजार किमतीची दुचाकी लांबविण्यात आली. बुधवारी दुपारी व रात्री 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटने प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याप्रकरणी भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय 48, धंदा नोकरी, रा. उंबरे ब्राम्हणी, ता. राहुरी हल्ली रा. मुसळे वस्ती, लोणी. ता. राहाता) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले की, किरण नानासाहेब दुशींग रा. उंबरे ता. राहुरी तसेच अज्ञात तिघांनी बुधवार दि. 27 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता ते रात्री 10.30 वाजेचे दरम्यान कोंची - मांची शिवारात तसेच तळेगाव रस्त्याने लोहारे येथे आवाजीनाथ मंदिरासमोर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून पिस्तुलचा धाक दाखवून फिर्यादी देव्हारे यांचे हात बांधून मारहाण करीत कुटुंबाला ठार मारू, अशी धमकी देत 3 लाख 50 हजार रुपये खंडणीची मागणी करून फिर्यादीचे खिशातील 11 हजार 500 रुपये रोख तसेच 30 हजार रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल तसेच 7 हजार किंमतीचा मोबाईल लंपास केला.

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार अपहरण करीत रस्तालूट केल्याचा किरण नानासाहेब दुशींग याच्यासह चौघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.