
राहाता |वार्ताहर| Rahata
राज्यात करोना या महामारीमुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राहाता तालुक्यातील राज्यात प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या पेरू डाळिंब, चिकू आंबा द्राक्षे या फळबागे बरोबर भाजीपाला व भुसार मालाच्या विक्रीसाठी चांगले दर मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला.
परिणामी तालुक्याच्या अर्थकारणाचे चक्र थांबले व व्यापार पेठे ओस पडू लागल्याने व्यवहार मंदावले. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीमुळे फळबागांना कुराड लावली आहे. राज्य सरकारचे शेतीमालाची विक्रीबाबत ठोस निर्णय नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची विक्री कशी करावी याबाबत कुठल्या प्रकारचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने लॉकडाऊनमध्ये फळांची व शेतीमालाची विक्री होत नाही म्हणून बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढत चालले आहे.