लॉकडाऊनमुळे पिंपरी निर्मळमध्ये विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी हिरमोड

लॉकडाऊनमुळे पिंपरी निर्मळमध्ये विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी हिरमोड

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्य सरकारच्या निर्णयानुसार 4 ऑक्टोबर पासून पाचवीच्या पुढील वर्ग सुरू होणार आहेत. मात्र अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्या वाढल्याने पिंपरी निर्मळ गाव दहा दिवस लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत.त्यामुळे सुरू होणार्‍या शाळा लांबणीवर गेल्याने विद्यार्थ्याचा हिरमोड झाला आहे.

करोनाचे रुग्ण कमी झाल्याने शासनाने सर्व व्यवहार खुले केले आहेत. मात्र त्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, गर्दी न करणे असे नियम घालून दिले आहेत. पिंपरी निर्मळ ग्रामस्थांना या सूचनांचा विसर पडल्याने सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात करोनाने गेल्या पंधरा दिवसांपासून डोके वर काढले आहे. आरोग्य विभाग आपल्यापरीने शर्थीचे प्रयत्न करून लसीकरण, ट्रेसींग, टेस्टींग करीत आहे. ग्रामीण भागात दहा पेक्षा जास्त

आज दीड वर्षानंतर उघडणार्‍या पाचवी ते सातवी पर्यतच्या शाळा उघडण्याच्या दिवशीच लॉनडाऊनमुळे बंदच राहील्या.सोमवारी शाळेत जायच्या तयारीत असणार्‍या विद्यार्थ्याचा मात्र हिरमोड झाला आहे. मोठ्यांनी केलेल्या निष्काळजीपणाचा फटका लहानग्यांना बसत असून ग्रामस्थांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.