विडी कामगारांना दोन हजार भत्ता द्या

धनंजय जाधव: मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
विडी कामगारांना दोन हजार भत्ता द्या

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनमुळे विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून राज्य सरकारने विडी कामगारांना दोन हजार रुपये जीवनभत्ता द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगर शहरात हजारो विडी कामगार आहेत. विडी उद्योग हाच त्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाहाचे साधन आहे. राज्य सरकारच्या लॉकडाऊनमुळे त्यांची रोजगार बुडाला आहे. विडी कंपनीचे मालकही त्यांना मदत देत नाहीत. सरकारने विविध घटकांना आर्थिक मदत दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही ‘रोजी बुडाली पण रोटी नाही’ असे सांगत मदती जाहीर केली, पण त्यातून विडी कामगार सुटले. विडी कामगारांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांचा आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. विडी कामगारांच्या सामाजिक व आर्थिक बाबीचा विचार करून राज्य सरकारने विडी कामगारांना दोन हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी केली आहे.

...........................

अमरधामातील ‘त्यांना’ सेवेत घ्या

कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या कंत्राटी कामगारांना विशेष बाब म्हणून महापालिकेच्या कायम सेवेत घ्यावे, असे पत्र अ‍ॅड. जाधव यांनी आयुक्तांना दिले आहे. कोरोना महामारीत मृतांचे नातेवाईकही दूर असले तरी जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी मृतदेहावर अंतिम संस्कार करतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना महामारीत उत्कृष्ट काम करणार्‍यांना विशेष बाब म्हणून महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी जाधव यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com