लॉकडाऊनची व्याप्ती वाढली, आणखी आठ गावे बंद ठेवण्याचे आदेश

लॉकडाऊनची व्याप्ती वाढली, आणखी आठ गावे बंद ठेवण्याचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 61 गावांमध्ये रविवारी लॉकडाउनचा आदेश दिल्यानंतर त्यात आता आणखी 8 गावांत नव्याने हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन केलेल्या गांवाची संख्या 69 झाली आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणाहून याला विरोध होऊ लागला आहे.

राज्यात करोना रुग्णांचे आकडे कमी होत असताना नगर जिल्ह्यात मात्र दिलासा मिळण्यास तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर उपाय हाती घेतले आहेत. पहिल्या टप्प्यात 61 गावांत लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतर नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, शेवगावमधील वडुले बु. या गावांतमध्ये लॉकडाउनचा आदेश देण्यात आला आहे.

नगरमध्ये वाढत असेलल्या रुग्ण संख्येने राज्याचे लक्ष वेधून घेतलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यात लक्ष घालून उपाय करण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेटी देऊन आढावा घेतला. त्यानंतर गावे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिले दोन दिवस बहुतांश गावांतील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी ऐन नवरात्रात घेण्यात आलेल्या निर्णयाला विरोधही सुरू झाला आहे.

नव्या 413 बाधितांची

जिल्ह्यात मंगळवारी 481 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या 3 लाख 37 हजार 352 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.97 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 413 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 641 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 97, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 194 आणि अँटीजेन चाचणीत 122 रुग्ण बाधीत आढळले.

Related Stories

No stories found.