लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणार्‍यांवर नगरमध्ये कारवाई

दिल्लीगेट, आयुर्वेद कॉर्नर, टिळक रस्त्यावर पोलीसांचे पथके तैनात
लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर
फिरणार्‍यांवर नगरमध्ये कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शनिवार आणि रविवारी नगरमध्ये (Saturday and Sunday Nagar City) दोन दिवस विकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) असताना विनाकारण लोक रस्त्यावर फिरत असल्याचा प्रकार सुरू होता. यामुळे रविवारी तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Police Station) हद्दीमध्ये दिलीगेट (Delhigate) परिसरामध्ये तर कोतवाली हद्दीमध्ये टिळक रोड (Tilak Road) परिसरामध्ये पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेत घराबाहेर फिरणार्‍यांवर कारवाई केली.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर (Corona) राज्य शासनाने (state Government) असे निर्बंध लागू केले आहेत. शनिवार व रविवार संपूर्ण दिवस लॉकडाऊन (Lockdown) असल्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद असताना देखील सुद्धा नागरिक विनाकारण बाहेर फिरतांना आढळून येत आहे. अनेकजण मास्क वापर सुद्धा वापरत नसल्याचे समोर आल्यावर नगर शहरातील कोतवाली (Kotwali) व तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Pollice Station) हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाईमुळे हाती घेतलेली आहे.

यात रस्त्यावर विनाकारण फिरणार (Wandering for no reason) यांना अडवून त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात येत आहे. तसेच ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही, वाहतूक नियमांचे उल्लंघन (traffic rules) करणार्‍यांवर सुद्धा कारवाई केली जात आहे. रविवारी सकाळपासूनच दिल्लीगेट परिसरामध्ये तोफखाना पोलिसांनी ही कारवाई मोहीम (Action campaign) सुरू केली तर कोतवाली हद्दीमध्ये आयुर्वेद हॉस्पिटलजवळ (Near Ayurveda Hospital) पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली होती. नगरमध्ये पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असून बंदचा आढावा सुद्धा ते घेत आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेचे (Municipal Corporation) विशेष पथक सुद्धा बंद बाबतचा आढावा घेऊन काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करत होते.

ग्रामीणला कडक अंमलबजावणी आवश्यक

शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शनिवारी रविवारी सकाळी भाजीसह अन्य खरेदीसाठी नागरिक घरबाहेर पडतांना दिसले. यासह अनेक गावात दुकानदार अर्धे शटर उडघून व्यव्हार करतांना दिसले. यामुळे पोलीसांनी ग्रामीण भागात लक्ष देण्याची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com