लॉकडाऊनवरून लोणी, कोल्हार, भगवतीपूर, कोर्‍हाळे, तिसगाव व्यापारी आक्रमक

दोन दिवसांत निर्णय न झाल्यास वेगळा मार्ग अवलंबण्याचा इशारा
लॉकडाऊनवरून लोणी, कोल्हार, भगवतीपूर, कोर्‍हाळे, तिसगाव व्यापारी आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचे रुग्णांची संख्या वाढत असल्याने 61 गावे लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आली आहेत. त्यापैकी महामार्गावर असलेल्या लोणी (Loni), कोल्हार (Kolhar), भगवतीपूर (Bhagwatipur), कोर्‍हाळे (Korhale), तिसगाव (Tisgav), आदी गावातील व्यापारी आक्रमक (Merchant Aggressive) झाली आहेत. नवरात्रौत्सव सुरू झाल्याने व्यवहास, उद्योग-धंदे यांना चालना मिळणार, असे दिसताच प्रशासनाने जाणीवपूर्वक व चुकीचे निकष लावत गावे बंद केल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला.

दहा पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या 11 तालुक्यातील 61 गावांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 10 दिवस हे निर्बंध असणार आहेत. ऐन सणा-सुदीच्या काळात व्यापार बंद होणार असल्याने व्यापारी आक्रमक (Merchant Aggressive) झाले आहेत. दोन दिवसात बंद मागे घ्यावा, व्यापाराला परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांच्याकडे केली. दोन दिवसात निर्णय झाला नाही तर वेगळा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही (Hint) व्यापार्‍यांनी दिला आहे.

दरम्यान, लोणी बुद्रुक (Loni Budruk) आणि खुर्द गावात जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधाचा फेरविचार करवा आशी मागणी खा. डॉ विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आणि व्यापार्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे केली आहे. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) सात गावांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध अन्यायकारक असल्याची भूमिका व्यापार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली. लोणी खुर्द आणि बुद्रुक या गावांची लोकसंख्या 40 हजार इतकी आहे. सर्व शैक्षणिक संस्था प्रवरा रुग्णालय भाजीपाला व जनावारांचा बाजार इत्यादीमुळे कारणांमुळे बाहेर गावाहून येणार्‍या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

लोणी (Loni) येथील ग्रामीण रुग्णालय व प्रवरा रुग्णालयात (Pravara Hospital) कोविड चाचण्या (Covid Testing) केल्या जातात. त्यामुळे लोणी (Loni) गावाची रुग्ण संख्या वाढत असल्याची बाब शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. लोणी गावातील नागरीकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून प्रवरा रुग्णालय (Pravara Hospital) ग्रामीण रुग्णालय तसेच विखे पाटील महाविद्यालयात कोविड उपचार केंद्र कार्यरत असून सर्व सुविधा उपलब्ध असल्याने उपचारांची सोय स्थानिक पातळीवर होत आहे.

प्रशासनाने 10 रुग्णांची अट ठेवून लावलेले निर्बंध करणे मोठ्या लोकसंख्येच्या गावांवर अन्याय करणारे असल्याने मोठ्या गावांना एक हजार लोकसंख्येमागे एक रुग्ण प्रमाण ठरवून त्याप्रमाणे गावातील निर्बंध लावण्याचा विचार व्हावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. गावात रुग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी ग्रामस्थ व्यापारी यांच्याशी चर्चा करून गावात सर्व व्यवहार आठ ते चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निश्चित केले. तथापी वारंवार लॉकडाऊन (Lockdown) केल्याने व्यापार्‍यांवर अर्थिक संकट असून शेतकर्‍यांनाही उत्पादीत मालाची विक्री करणे तसेच रोजगाराचा निर्माण होणारा प्रश्न लक्षात घेवून गावात लावलेल्या निर्बंधाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

लोकांकडून नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे करोना वाढतो आहे. पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्यानेच गावे बंद करण्याचा निर्णय घेतला. मी एकट्याने नव्हे तर करोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य, पोलीस, महसूल अशा संयुक्त समितीने हा निर्णय घेतला आहे. करोना निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे. करोनाची स्थिती पाहूनच गावे बंद ठेवायची की चालू करायची याचा निर्णय होईल. गावे बंद करण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही.

- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

Related Stories

No stories found.