लॉकडाऊनच्या भितीने राहुरीच्या पूर्वभागात टरबूज शेती तोट्यात

लॉकडाऊनच्या भितीने राहुरीच्या पूर्वभागात टरबूज शेती तोट्यात

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील टरबूज-खरबुजाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी वाढते तापमान,

विजेचा खेळखंडोबा तसेच लॉकडाऊनच्या भीतीने टरबूज-खरबूज उत्पादक शेतकरी चहुबाजूने संकटात सापडला आहे.

गेल्या वर्षीपासून शेतकर्‍यांना टरबूज व खरबूज वाड्यात नफा तर सोडा तोट्यात घाटा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने त्याचा परिणाम फळांवर व वेलीवर होत असून वेली लवकर सुकण्याचे प्रमाण वाढले आहे. तर फळांचे देखील आकारमान कमी राहिले आहे.

मी दरवर्षीप्रमाणे खरबूज वाडी लागवड केली आहे. यावर्षी देखील दोन एकर खरबूज शेती केली आहे. आता ऐनवेळी लॉकडाऊन पडला आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक फिरकत नाही. आता देखील लॉकडाऊन पडला असून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

- श्रीकांत बोरूडे, शेतकरी.

माझ्या एक एकर टरबूज वाडीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. सध्या शेतात टरबूज खराब होऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी घरगुती 10 रुपये प्रमाणे विक्री चालू केली आहे. वाडीतून बाहेर काढणीसाठी 2 रुपये नगाप्रमाणे खर्च येते. त्यामुळे काहीच परवडत नाही. यावर्षी काही तरी पदरात पडेल असे वाटले. परंतु काहीच शिल्लक राहिले नाही. वैभव वने, शेतकरी.

- वैभव वने, शेतकरी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com