लॉकडाऊन असतानाही शेतात रंगताहेत पार्ट्या

लॉकडाऊन असतानाही शेतात रंगताहेत पार्ट्या

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना डॉक्टर, पोलीस, महसूल यंत्रणेची दमछाक होत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात काही नागरिक शेतात जाऊन उच्चभ्रू तळीरांम पार्ट्या करत आहेत. लॉकडाऊनचा फज्जा उडवत रंगीत-संगीत पार्ट्या तसेच करमणुकीचे खेळ सुरू आहेत. अशा ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे उल्लंघन करून लॉकडाऊनची मजा लुटली जात आहे.

करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे आणि अशावेळी ग्रामीण भागातील नागरिक शेतात जाऊन पार्ट्या रंगवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे अशा पार्ट्यांसाठी बाहेरून खाद्यपदार्थ मागविले जात आहेत. अशी विशेष मागणी पूर्ण करण्यासाठी परिसरातील संबंधित विक्रेत्यांकडून दुप्पट, तिप्पट दर लावून पाव, नॉनव्हेज, व्हेज, अवैध दारू यासह अन्य वस्तू पुरविल्या जात आहेत.

अशा पार्ट्यांतून गेल्या काही दिवसांत अनेकांनी चांगली गंगाजळी जमा केली असल्याची चर्चा आहे. दिवसा व रात्री उशीरा अशा पार्ट्या रंगत असल्याने करोना सारख्या महामारीत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहतं आहे

शनिवार आणि रविवारी अशा पार्ट्यांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनचे नियम मोडून शेतीवर जाऊन पार्ट्या करणार्‍यांवर अंकुश कोण ठेवणार? अशी चर्चा परिसरात असून अशा पार्ट्यांतून करोना बाधितांची संख्या वाढू शकते. पार्ट्यांचे आयोजन करताना तसेच येथे बाहेरून खाद्य पदार्थ येत असल्याने यातून करोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. ग्रामीण भागातील काही हौशी तळीराम अशा पार्ट्या करत असून ते स्वत:सह इतरांनाही करोनाच्या धोक्यात लोटत आहेत. अश्या प्रकारे जर कोणी नियम मोडून अन्य ठिकाणी अथवा शेतात जाऊन पार्ट्या करून नियमांचे उल्लंघन करत असतील तर जमाव बंदी 144 व 188 कलम नुसार गुन्हे दाखल होऊ शकतात त्यामुळे या तळीरामांना लवकरचं सावध रहावे लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com