लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बिकट
सार्वमत

लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बिकट

स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक पद्धत सध्या महिना दोन महिने बंद करून फक्त आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नंबरची नोंद करून धान्याचे वाटप करण्याची जनतेतून मागणी

Arvind Arkhade

वडनेर |वार्ताहर| Vadner

पारनेर तालुक्यात करोना पॉझिटिव्ह संख्या दिवसेंदिवस वाढत असून चारशेचा टप्पा ओलांडला असून एकीकडे लॉकडाऊन करण्याचा निर्णय तर दुसरीकडे स्वस्त धान्यासाठी बायोमेट्रिक असा दुहेरी पेच सरकारने निर्माण केला आहे. सध्या शहरी व ग्रामीण भगातील नागरिकांची अर्थव्यव्यवस्था बिकट झाली आहे. महिना दोन महिने बायोमेट्रिक योजना बंद करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

गेली तीन ते चार महिने शहरी भागात करोना पॉझिटिव्ह रुण्गांची संख्या वाढू नये. तसेच याचा संसर्ग ग्रामीण भागात होऊ नये यासाठी स्वस्त धान्य दुकानात धान्य घेणार्‍या जनतेसाठी थम्ब (अंगठा) पद्धत बंद केली होती. मात्र ही पद्धत या पंधरवड्यात सुरू केल्याने जनतेतून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गोरगरीब जनतेसाठी सरकारने माणसी दोन किलो गहू, तांदूळ तसेच डाळी मोफत देण्याचा उपक्रम सरकारने सुरू केला होता. आधार कार्ड नसेल तर रेशनकार्ड किंवा रहिवासी असल्याचा दाखला असल्याचा पुरावा उपलब्ध असला तरी हे मोफत धान्य जनतेला मिळत असल्याने लाखो गोरगरीब गरजू घटकांना याचा लाभ मिळत होता.

लॉकडाउनमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. हाताला काम नाही. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून घराबाहेर पडायचे नाही लॉकडाऊनमुळे व्यवसाय उद्योगधंदे बंद अशा अवस्थेत खायचे काय हा प्रश्न जनतेपुढे निर्माण झाला होता. मात्र मोफत धान्य उपक्रमामुळे लाखो कुटुंबांना आधार मिळाला होता.

त्याचवेळी सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व सर्व जनतेला स्वस्त व मोफत धान्याचा फायदा मिळावा यासाठी थम्ब (अंगठा) ही पद्धत सरकारने तात्पुरती बंद केली होती. मात्र राज्यात करोनाचे संकट कमी न होता वाढत चालले आहे आणि ग्रामीण भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात करोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याची प्राथमिक चाचणी होण्यासाठी रॅपिड टेस्ट सुरू केली असल्याने साधी सर्दी व थोडा ताप असला तरी ही टेस्ट करण्यासाठी भीतीपोटी ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतात.

रॅपिड माध्यमातून ही टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्यावर त्या व्यक्तीचा ग्रामीण भागात बोलबाला झाल्यावर त्या कुटुंबाला लोक सापत्नपणाची वागणूक देतात. अशाप्रकारे करोनाची भीती गावागावांत वाढत आहे.

प्रत्यक्षात करोना पॉझिटिव्ह रुग्ण रुण्गालयात गेल्यावर तो दोन ते तीन दिवसांत बरा होतो, अशी परिस्थिती प्रत्यक्षात पहायला मिळत असल्याने करोनाची तिव्रता कमी झाल्याचे दिसून येत असून काही रुग्णांना तर पॉझिटिव्ह निघूनही घरीच औषधोपचार करीत घरीच विलीगीकरणात ठेवतात. मात्र अद्यापही ग्रामीण भागात करोनाचा नको तो बोलबाला असल्याने अद्यापही भितीचे वातावरण आहे.

यासाठी स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक पद्धत सध्या महिना दोन महिने बंद करून फक्त आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नंबरची नोंद करून धान्याचे वाटप करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

स्वस्त धान्य दुकानासमोर गर्दी होत असते. डिस्टन्सिंग नियम पाळून दुकानदार सॅनिटायझर वापर करीत नियमांची अंमलबजावणी करीत असतात मात्र काही गावांची लोकसंख्या जास्त तर स्वस्त धान्य दुकानांची संख्या कमी अशाप्रकारे दुकानदार कितीही नियम पाळीत असले तरी ग्राहकाला मात्र लवकर धान्य घेण्याची घाई झालेली असते. तशातच मशीनवर अंगठा देण्याची पद्धत सुरू केल्याने एका ग्राहकाला धान्य घेण्यासाठी पाच मिनीटापेक्षा जास्त वेळ लागत असतो. यासाठी बायोमेट्रिक पद्धत बंद करून पूर्ण महिना धान्य दुकाने सुरू राहतील, याची दक्षता तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी घेण्याची मागणी जनतेतून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com