नगर शहरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

एलसीबीची कामगिरी : सहा दुचाकी हस्तगत
नगर शहरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह (Nagar City), उपनगरातून दुचाकींची चोरी (Bike theft) करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने अटक (Arrested) केली. दिलीप दत्तात्रय शिंदे (वय 26), प्रफुल्ल गजानन गांगेकर (वय 30), खलील बालम शेख (वय 45 तिघे रा. नागरदेवळे ता. नगर), अमजद हुसेन शेख (वय 45 रा. मोमीनपुरा, भिंगार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार अक्तार जहूर अहमद शेख (रा. गवळीवाडा, भिंगार) हा पसार झाला आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून (Accused) चोरीच्या सहा दुचाकींसह दोन लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर शहरासह, उपनगर व नगर ग्रामीण भागातून दररोज दोन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. यामुळे नगरकर त्रस्त आहेत. दुचाकी चोरी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj patil) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिल्या होत्या. निरीक्षक कटके यांनी सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी संदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांची वेगवेगळी पथके स्थापन केली.

या पथकांनी नगर शहरात दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू (The search for bike thieves continues in the city) केला. नागरदेवळे येथील दिलीप शिंदे हा साथीदारांसह दुचाकी चोरीत असल्याची खबर निरीक्षक कटके यांना मिळाली. त्यांनी पथकाला आरोपी जेरबंद करण्याच्या सूचना केल्या. पथकाने नागरदेवळे (Nagardevale) येथील तिघांसह भिंगारच्या (Bhingar) मोमीमपुरातून एकाला अटक केली. अधीक्षक पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या (LCB) पथकाने ही कारवाई केली.

विविध ठिकाणांहून चोरल्या दुचाकी

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी या दुचाकी नगर शहरातील तारकपूर बस स्थानक, रेल्वे स्टेशन पार्किंग, गुलमोहर रोड, नेता सुभाष चौक, गोविंदपुरा, जिल्हा शासकीय रुग्णालय येथून चोरल्या असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

गांगेकर, शिंदेकडून राज्यभरात दुचाकी चोर्‍या

दुचाकी चोरणार्‍या टोळीतील आरोपी प्रफुल्ल गांगेकर व दिलीप शिंदे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात दुचाकी चोरीचे राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. गांगेकर याच्याविरोधात अकोले, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांत 20 गुन्हे दाखल आहेत. शिंदे याच्याविरोधात पाथर्डी व पुणे जिल्ह्यातील वानवाडी, शिरूर या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com