कर्जाला कंटाळून तरूण शेतकर्‍यांची आत्महत्या

कर्जाला कंटाळून तरूण शेतकर्‍यांची आत्महत्या

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

विजय रामदास करंजुले (वय 42 रा. पिंप्री कोलंदर) येथील शेतकरी आणि दूध व्यावसायिक असलेले तरुणांने राहत्या घरी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

करंजुले यांचा शेती बरोबर दूध व्यवसाय होता. दूध व्यवसायात कमी असलेला बाजारभाव आणि वाढलेला खर्च यात खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडता आले नव्हते. यातच शेतीचा देखील खर्च वाढत असल्याने कर्जाचा डोंगर वाढत असतांना पाडळी रांजणगाव येथील सेवा सोसायटीच्या कर्ज, कॅनरा बँक शिरूर येथील कर्ज या सर्व कर्जाच्यासह खाजगी सावकाराचे कर्जाचा तगादा याला कंटाळून करंजुले यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com