लोन अ‍ॅपद्वारे साडेचौदा लाखांना गंडा

सावेडीतील व्यावसायिकाची फसवणूक
लोन अ‍ॅपद्वारे साडेचौदा लाखांना गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोन अ‍ॅपद्वारे सावेडी उपनगरातील एका व्यावसायिकाची सुमारे 14 लाख 43 हजार 36 रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधीत व्यावसायिकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोबाईल लोन अ‍ॅपद्वारे फसवणूक करणार्‍या अज्ञात सायबर गुन्हेगारांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने फेसबुकवर डिसेंबर 2021 मध्ये मोबाईल लोन अ‍ॅपद्वारे झटपट कर्ज मिळवा, अशी जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीनुसार त्यांनी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे कर्ज घेतले होते. ते कर्ज ऑनलाईन फेडूनही त्यांना पैशासाठी तगादा लावण्यात आला.

फिर्यादीने विविध लिंकच्या माध्यमातून 14 लाख 43 हजार 36 रुपये एवढी रक्कम देऊनही त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावण्यात आला. पैसे भरले नाही तर फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. शिवीगाळ करण्यात आली. या सर्व त्रासाला कंटाळून सदर व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com