video : विद्यार्थी रमले शालेय कवितांत

धमाल बालमस्ती : प्रकाश पारखे व चमूचे उत्स्फूर्त सादरीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)-

‘सार्वमत-देशदूत’ समूहातर्फे विद्यार्थी मित्रांसाठी आयोजित ‘धमाल बालमस्ती’ या ऑनलाईन कार्यशाळेत शुक्रवारी अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य प्रकाश पारखे व त्यांच्या चमूने धमाल शालेय कविता सादर केल्या.

हा कार्यक्रमाचे सोशल मीडियावर प्रक्षेपण होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ‘धमाल शालेय कविता’ हा कार्यक्रम सादर झाला. पहिलीपासून दहावीपर्यंत पाठ्यपुस्तकात असलेल्या विविध कविता पारखे यांनी सुमधूर संगीताच्या साथीसह सादर केल्या. ‘अनंता एवढे द्यावे, फुलांचे रंग न जावे’, ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, ‘धरिला पंढरीचा चोर’, ‘वंद्य वंदे मातरम्’ अशा एकाहून एक सरस कवितांचे सादरीकरण विद्यार्थ्यांसाठी झाले. त्यांना किबोर्डवर मंगेश बिडवे, ऑक्टोपॅडवर गणेश गोरडे व ढोलकीवर वैभव पवार यांनी साथसंगत केली. सुत्रसंचालक व शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी कवितांचा प्रवास एकसुत्रात बांधला.

छटा व्यंगचित्रांच्या

शनिवार, 12 जून रोजी रवी भागवत ‘छटा व्यंगचित्रांच्या’ या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. व्यंगचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अनेक वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिकातून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com