लिंकींग करणार्‍या दुकानदार अन् कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे स्पष्ट आदेश
लिंकींग करणार्‍या दुकानदार 
अन् कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांना आवश्यक असणारे खते, बियाणे आणि किटकनाशके उपलब्ध करून द्या, विनाकारण कृषी निविष्ठांसोबत अन्य उपपदार्थांचे लिकींग करू नका. लिकींग करणारे आढळले, तक्रार आल्यास थेट संबंधीत दुकानदार आणि संबंधीत कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खत सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते. जिल्ह्यात खते आणि बियाणे यांच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर समिती असून या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी आहे. समितीत सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, तर सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी, पोलीस अधीक्षक, खत विक्रेत्यांचे प्रतिनिधी, वाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी सदस्य आहे.

या समितीची बैठक झाली असून यात शेतकर्‍यांना कृषी निविष्ठासोबत होणार्‍या लिकींगबाबत चर्चा झाली. यावेळी खते आणि बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींसह खते विक्रत्यांना लिकींगबाबत जिल्हाधिकारी यांनी विचारणा केली. त्यावर विक्रेत्यांनी कंपनीकडे बोट दाखवत खतांसोबत कंपनी अन्य उपपदार्थ विक्रेत्यांच्या माथी मारत असल्याचे सांगण्यात आले. त्यावर कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केल्यावर त्यांनी कंपनी पातळीवर चर्चा करून यापुढे लिकींग न करण्याचे लेखी पत्र देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शेतकर्‍यांच्या मागणीनूसार त्यांना कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, त्यांना बळजबरीने अन्य उपपदार्थ घेण्याची शक्ती करू नका, अन्य संबंधीतांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com