शिर्डीत वीज कोसळली, शिर्डीकर अंधारात!

शिर्डीत वीज कोसळली, शिर्डीकर अंधारात!

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

रविवारी शिर्डीत सायंकाळी अचानक वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या दरम्यान शिर्डी शहरात नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडांने पेट घेतला. तात्काळ अग्निशामक दलाने आग विझवली. मात्र अचानक पडलेल्या विजेमुळे सुदैवाने कुठलीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

रविवारी शिर्डी शहरात अचानक वादळी वार्‍यासह विजेचा कडकडात सुरू होऊन रिमझिम पावसाची सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात कडकडाट सुरू असल्यामुळे शिर्डीतील साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते यांच्या घरासमोरील असल्याच्या नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाच्या झाडांनी पेट घेतल्यामुळे नागरिकांनी तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची संपर्क केला. शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. अचानक मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाट तसेच वीज पडल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. अनेक तास शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट सुरू असल्यामुळे सायंकाळी सहा वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिक वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट बघत होते.

भंडारदरातही हजेरी

भंडारदरा वार्ताहराने कळविले की, अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात काल सायंकाळी पाच वाजता रिमझीम पाऊस सुरू झाला. त्यानंतर 6 वाजेनंतर पावसाने जोर धरला होता. सखल भागात पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

श्रीरामपुरातही अवकाळी

श्रीरामपूर शहर व परिसरात रविवारी रात्री अधूनमधून रिमझीम पाऊस कोसळत होता. यापूर्वी श्रीरामपूर शहर व परिसरात गारपीट झाली होती. त्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता पुन्हा हे संकट आल्याने शेतकरी वर्ग हबकून गेला आहे. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहें .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com