कापूस वेचणी करणाऱ्या दोन शेतमजुरांवर वीज कोसळली

कापूस वेचणी करणाऱ्या दोन शेतमजुरांवर वीज कोसळली

राहुरी l प्रतिनिधी

काल सायंकाळी राहुरी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान तालुक्यातील पाथरे शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या टोळीतील दोन शेतमजुरांवर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. यात शेतमजुरांवर गंभीर इजा झाली असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबात माहिती अशी की, तालुक्यातील पाथरे शिवारात ज्ञानेश्‍वर आप्पासाहेब जाधव या शेतकर्‍याच्या शेतात बारा शेतमजुर कापूस वेचणी करत होते. दरम्यान शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाऊस आल्यानंतर बारा शेतमजूर भोकराच्या झाडाखाली बसले असता शब्बीरभाई जानूभाई पठाण व हिराबाई रामदास बाचकर या दोघांच्या अंगावर वीज कोसळली.

यात शब्बीरभाई जानूभाई पठाण यांच्या पाठीला व पायाला गंभीर जखमा झाल्या तर हिराबाईच्या अंगावर लोळ उडाले. त्यांना श्रीरामपूर येथे एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कामगार तलाठी सुवर्णा शिंदे व पोलीस पाटील दादासाहेब पवार यांंनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेची खबर तहसीलदारांना दिली. तसेच खुडसरगाव गावठाणात रोहित्र जळून खाक झाले.

Related Stories

No stories found.