अहमदनगर (प्रतिनिधी) -

पाथर्डी येथील आयुब उस्मान सय्यद यांच्या खून प्रकरणी आरोपी समद सालार सय्यद (वय 23 रा. पाथर्डी) याला आजन्म

जन्मठेप व 10 हजार रूपये दंड, दुसरा आरोपी शकुर सालार सय्यद (वय 22 रा. पाथर्डी) याला सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातु यांनी हा निकाल दिला.

आयुब सय्यद व त्यांचा भाचा गफूर उस्मान सय्यद यांच्यात पाथर्डी शहरातील जानपिरबाबा दर्गा येथील पुजा करण्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असे. यावरून गफूर यांचे नातू समद सय्यद व शकुर सय्यद हे दोघे आयुब सय्यद व त्यांच्या पत्नीला नेहमी त्रास देत असे. 24 जुलै 2018 रोजी गफूर सय्यद, समद सय्यद, शकुर सय्यद यांनी आयुब सय्यद यांच्याशी झटापट केली. समद याने आयुब यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केले तर शकुर याने आयुब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत आयुब यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आयुब यांच्या पत्नीने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी समद सय्यद व शकुर सय्यद यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातु यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासले गेले. न्यायालयासमोर आलेले साक्षी- पुरावे, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून केदार केसकर यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकिल सतिष पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर पोलीस कर्मचारी बी. बी. बांदल, पांडुरंग पाटील, नंदकिशोर सांगळे, काशिद यांनी मदत केली.