लेटर टू डेअरी मिनिस्टर आंदोलनाला राज्यात सुरुवात

पहिल्याच दिवशी शेकडो पत्र दुग्ध विकास मंत्री यांच्या पत्त्यावर रवाना
लेटर टू डेअरी मिनिस्टर आंदोलनाला राज्यात सुरुवात

अकोले |प्रतिनिधी| Akole

दुधाला एफआरपीचे (Milk FRP) संरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी (Demand) दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने (Milk Producers Farmers Struggle Committee) सुरू असलेल्या आंदोलनाचा (Movement) पुढील टप्पा म्हणून कालपासून राज्यात लेटर टू डेअरी मिनिस्टर (Letter to Dairy Minister Movement) आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

अकोले (Akole) येथील सिद्धेश्वर दूध संस्थे बाहेर चेअरमन संदीप शेटे, स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेशराव नवले, सुरेश नवले, आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन (Movement) करत घोषणा दिल्या.

अकोले (Akole) येथील कोतुळ (Kotul) परिसरातील शेतकर्‍यांनी सदाशिव साबळे, बाळू देशमुख, प्रकाश आरोटे, रघुनाथ जाधव आदींच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा व विधान परिषदेवर असलेल्या सर्व आमदारांना व मंत्र्यांना 425 निवेदने पोस्टाने पाठविली. संकलन केंद्रावरून दुग्धविकास मंत्र्यांना (Minister of Dairy Development) पत्र पाठविण्यात आली.

9 ऑगस्ट रोजी राज्यभर (State) झालेल्या दूध आंदोलनाचा (Milk Movement) पुढचा टप्पा म्हणून दुग्ध विकास मंत्री (Minister of Dairy Development) यांना हजारो पत्र पाठवण्याचे हे आंदोलन (Movement) सुरू करण्यात आले आहे. 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रांवर (Milk Producers Farmers Milk Collection Centers) जमतील व सामूहिकपणे आपल्या नऊ मागण्यांचा उल्लेख असणारी पत्रे दुग्धविकास मंत्र्यांना (Dairy Development Minister) पाठवून आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधतील असे आंदोलनाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.

काल आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेकडो दूध उत्पादक केंद्रांवरून दुग्धविकास मंत्र्यांना पत्रे पाठवण्यात आली. पुढे पंधरा दिवस विविध ठिकाणावरून अशी पत्रे पाठवण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला एफ. आर. पी. (FRP) लागू करणार असल्याचे आश्वासन दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Dairy Development Minister Sunil Kedar) यांनी संघटनेला दिले होते.

यासंदर्भात मंत्रिमंडळ टिप्पणीही बनविण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाने साखर आयुक्तांचे याबाबत मत विचारले असता दूध क्षेत्रासाठी एफ. आर. पी. (FRP) चा कायदा करावा, असे अनुकूल मत साखर आयुक्त कार्यालयाने नोंदविले असल्याचेही सांगण्यात आले आहे. आता अधिक विलंब न लावता सरकारने यानुसार दुधाला एफ. आर. पी. (FRP) चे संरक्षण लागू करावे व वरील उर्वरित मागण्यांना मंजुरी द्यावी अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत.

डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, श्रीकांत करे, उमेश देशमुख, सतीश देशमुख, धनुभाऊ धोरडे, जोतिराम जाधव, डॉ. अशोक ढगे, दीपक वाळे, महेश नवले, सुरेश नवले, रामनाथ वदक, सुहास रंधे, दादाभाऊ गाढवे, राजकुमार जोरी, सुदेश इंगळे, सिद्धपा कलशेट्टी, माणिक अवघडे आदी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com