पारनेर तालुका ऑक्सिजन क्लस्टर बनवू - पोपटराव पवार

पारनेर तालुका ऑक्सिजन क्लस्टर बनवू - पोपटराव पवार

भाळवणी (प्रतिनिधी) - ‘आडवाटेचं पारनेर’च्या सहकार्याने पारनेर तालुका ऑक्सिजन क्लस्टर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

भाळवणी येथील शृंगऋषी गडावर वृक्षारोपण व बीजारोपण मोहीम राबवण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. ‘आडवाटेचं पारनेर’ या टीमचा प्रथम वर्धापनदिन आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर ‘आडवाटेचं पारनेर’ने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यात आपण पारनेर तालुक्यातील सर्व डोंगरांवर नियोजनबद्ध वृक्षलागवड करून ऑक्सिजन क्लस्टर उभारू, असे यावेळी पोपटराव पवार यांनी सांगितले.

टीम आडवाटेचं पारनेरने विविध बियांची सीड बँक बनवली असून या बिया व रोपांची तालुक्यातील विविध डोंगर व गड किल्ल्यांवर लागवड करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज शृंगऋषी गडावर वड, पिंपळ, कडुलिंब, करंजी, चिंच, बहावा, शिसम, आंबा अशा विविध 3 हजार बिया व रोपांची लागवड करण्यात आली, असे टीमचे सदस्य मेजर हरी व्यवहारे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच इंजि. संदीप ठुबे, उद्योजक रंगनाथ रोहोकले, उद्योजक संदीप रोहोकले, निशिकांत रोहोकले, विजय रोहोकले, मेजर संतोष रोहोकले, छबन रोहोकले, राजू जाधव, संतोष भनगडे, अरुण रोहोकले, अनंत रोहोकले, प्रा. प्रमोद चेमटे, संतोष कदम, श्रद्धा थोरात, कृषीकन्या श्रद्धा ढवन, पत्रकार विनोद गोळे, राम तांबे, मेजर हरी व्यवहारे, सचिन गायखे, संतोष सोनावळे, महाबली मिसाळ, अशोक गायकवाड, प्रफुल्ल कार्ले, श्रीनागेश्‍वर आरती मंडळाचे सुरेश भांबरकर, प्रणय रोकडे आदींसह सुमारे 100 सदस्य व भाळवणी पंचक्रोशीमधून ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संतोष भनगडे यांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com