जिल्हा रुग्णालय आवारात वाहने पार्किंग करु द्या; कर्मचाऱ्यांचे आंदोलन

जिल्हा रुग्णालय आवारात वाहने पार्किंग करु द्या; कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अहमदनगर|Ahmedagar

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्किंग करण्यास बंदी घातली आहे.

सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांनाही वाहने बाहेर पार्क करावी लागत आहे. यामुळे आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वाहने पार्किंगवरून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

रुग्णालयाच्या आवारात आमची वाहने पार्किंग करून द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. रुग्णालयाच्या बाहेर वाहने पार्किंग केल्याने दोन कर्मचाऱ्यांची वाहने चोरीला गेली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक यांनी रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्किंग करण्यास मनाई केल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी‌ व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com