अस्तगाव परिसरात बिबट्याचे दिवसाढवळया दर्शन, पाहा व्हिडिओ

मादीसह दोन बच्छड्यांचा मुक्त वावर
अस्तगाव परिसरात बिबट्याचे दिवसाढवळया दर्शन, पाहा व्हिडिओ

अस्तगांव | वार्ताहर

अस्तगाव (astgoan) भागात बिबट्याचे (leopard news) दिवसा दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मादी बिबट्या आणि तिचे दोन बच्छाड्यांचे दर्शन होत आहे.

अस्तगाव येथील गोदावरी कालव्याच्या (godavari canal) पूर्वेला पळस वाट रस्त्याला त्रिभुवन वस्ती आहे. राहाता पंचायत समितीचे (rahata panchayat samiti) माजी सभापती निवास त्रिभुवन यांच्या वस्ती लगत असलेल्या उसात या बिबट्याचे दर्शन होते. त्या भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसाचे लपन असल्याने बिबट्यांचा वावर त्या भागात आहे.

मादी बिबट्याच्या मागोमाग ते दोन बच्छाडे एका मागो माग चालतात. त्या भागातील कुत्र्यांना त्यांनी फस्त केले आहे. निवास त्रिभुवन यांचे तीन ते चार कुत्रे आता पर्यंत बिबट्यानी फस्त केली आहेत. त्रिभुवन वस्तीच्या परिसरात रांजणगाव रोड ते दक्षिणेकडील लक्ष्मी माता रोड पर्यंत दोन किमीमध्ये सर्व ऊस असल्याने बिबट्याचा मुक्त वावर त्या भागात आहे.

हे बिबटे कधी रांजणगाव परिसरात ही दिसतात. पण पुन्हा ते अस्तगांव च्या त्रिभुवन वस्ती भागात येतात. तेथील रहिवाशी प्रा. विजय त्रिभुवन यांना हे त्रिकुट दोन तीन वेळा दिसले. त्यांच्या उसाच्या शेतातून दुसऱ्याचा उसाच्या शेतात जात असताने त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मादी सह तिचे दोन्ही बछडं बघितले. त्यांनी ही माहिती सार्वमतला दिली.

पिंजरा लावण्यास अडचण!

या बिबट्याना पिंजरा लावून पकडण्यात अडचणी आहेत. मादी बिबट्या पिंजऱ्यात घुसल्या नंतर लोखंडी गेट पडू शकते मात्र तिचे दोन्ही बछडं तिचा मोगोमाग येतात त्या मुले त्यांना पिंजऱ्याचे गेट लागून त्यांचा मृत्यू होण्याची भीती असल्याने वनविभाग पिंजरा लावण्यास धजत नाही. ही दोन्ही बच्छडे मोठी होऊन मादी बिबट्या पासून दूर होतील, त्या वेळी त्यांना जे्रबंद करता येऊ शकेल तो पर्यंत ते मुक्त राहतील. मात्र या बिबट्यांच्या दिवसा ढवळ्या दर्शनाने ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत.

Related Stories

No stories found.