सुपा परिसरात बिबट्याची दहशत

वासराचा पाडला फडशा
सुपा परिसरात बिबट्याची दहशत

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) सुपा (Supa) परिसरात बिबट्याने (Leopard) गेले आठ दिवसापासून दहशत निर्माण (Created panic) केली असून त्यामुळे पाळीव प्राण्यांसह नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने (Forest Department) याची वेळीच दखल घेऊन पिंजरा लावावा (Cage Demand) अशी मागणी सुपा (Supa) येथील नागरिकांनी केली आहे.

सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता सुपा (Supa) डोंगरवाडी येथील शेतकरी रवींद्र बर्डे हे सकाळी नेहमीप्रमाणे उठले. यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्यांने (Leopard) शेतकर्यावर हल्ला करणार इतक्यात पाळीव कुत्रे (Dog) जोरजोरात भुंकू लागले व बिबट्यावर (Leopard) जोरात धावून गेल्याने सुदैवाने तरुण शेतकरी रवींद्र बर्डे यांचा जिव वाचला. मात्र याच दरम्यान बिबट्याने घरापुढे गोठ्यात असलेल्या वासराचा मात्र फडशा (Leopard Calf Attack) पाडला.

घटनेची माहिती मिळताच वस्तीवरील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. भर पहाटे बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केल्याने शेतकरी भयभीत (Farmers scared) झाले आहेत. डोंगरवाडी परीसरात झाडा झुडपांचे मोठे वास्तव आहे. वाडीलगत डोंगर असल्याने जंगली प्राण्यांचा नेहमी याठिकाणी वावर असतो. अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्याने सोमवारी पहाटे घरातच दर्शन दिल्याने डोंगरवाडीवरील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठा अनर्थ घडण्याअगोदर वनविभागाने त्वरित दखल घ्यावी व पिंजरा लाऊन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केले आहे.

याबाबत वन रक्षक सुपा बिट श्रीमती उमाताई केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट देत संबंधित घटनेचा पंचनामा करत सदर पशुधन मालकास शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देण्याकरीता कागदोपञी कारवाई पुर्ण केली .अशी माहिती श्रीमती केंद्रे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com