पोहेगाव परिसरात बिबट्याची दहशत

पोहेगाव परिसरात बिबट्याची दहशत

सोनेवाडी | वार्ताहर

आला आला बिबट्या आला... आज इथे तर उद्या तिथे... सावध रहा, रात्री घराबाहेर पडू नका... असे सल्ले पोहेगाव परिसरात मिळत असल्याने दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यापासून पोहेगाव परिसरात सोनेवाडी, पंचकेश्वर, नगदवाडी, म्हसोबावाडी आदी भागात बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले आहे. एवढेच नव्हे तर या बिबट्याने परिसरातील अनेक शेळ्या, मेंढ्या, कुत्री, कोंबडी यांच्यावर ताव मारत आपली दहशत कायम ठेवली आहे.

काही दिवसांपूर्वी बिबट्याची पिल्ले वनविभागाचे अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली. मात्र बिबट्या जेरबंद न झाल्यामुळे ही पिल्ले पुन्हा सोडून देण्यात आली. त्यामुळे या परिसरात बिबट्या असल्याची खात्री वन विभागालाही आहे.

दरम्यान काल हा बिबट्या सोनेवाडी-पोहेगाव रोड लगत नऊचारी परिसरात अनेक नागरिकांनी पाहीला. त्यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहे. शेतात व इतरत्र कुठेही जाण्यासाठी परिसरातील नागरिक सात वाजेनंतर बाहेर पडत नाही.

या बिबट्यांची संख्या एक दोन किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते. या बिबट्याने अजूनपर्यंत माणसावर चाल केली नाही, मात्र अनेक पाळीव प्राण्यावर ठार करत ताव मारला आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com