सोनेवाडी पंचकेश्वर परिसरात बिबट्याचा वावर

नागरिकांमध्ये घबराट
सोनेवाडी पंचकेश्वर परिसरात बिबट्याचा वावर

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील सोनेवाडी (Sonewadi) परिसरात काल बिबट्याने (Leopard) दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये (People) घबराट निर्माण झाली आहे. काल संध्याकाळी सावळीविहीर (Savlivihir), रांजणगाव देशमुख (Rajangav Deshmukh) रस्त्याच्या बाजूला तुकाराम बाबुराव गुडघे यांच्या उसाच्या शेताजवळ ह्या बिबट्या दिसून आला. शेजारी राहत असलेले अमोल सुरेश हेंगडे यांनी हा बिबट्या पाहिल्यानंतर प्रसंगावधान राखत त्यांनी आसपास राहत असलेल्या वस्तीवरील नागरिकांना याबाबत सूचना दिली.

या परिसरात अनेक वस्ती असून लोक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असल्याने या बिबट्याच्या धाकाने नागरिकांना पहारा देण्याची वेळ आली आहे. डाऊच खुर्द, डोराळे नंतर हा बिबट्या पुन्हा एकदा सोनेवाडी (Sonewadi) परिसरात आढळला. बिबट्या (Leopard) वावर या परिसरात असल्याने शेतकऱ्यांनाही आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे. बिबट्याला लपण्यासाठी प्रचंड उसाचे शेत असल्याने हा बिबट्या या नागरिकांत घबराट निर्माण करून देत आहे.काल पंचकेश्वर शिवारातील सोनेवाडी येथील नागरिकांनी एकत्र येत या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com