बिबट्याने पाडला मेंढीचा फडशा; वडगावगुंड परीसरात दहशत कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पारनेर | तालुका प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील वडगावगुंड परीसरामधे गजानन बरकडे या मेंढपाळाच्या वाड्यावर शनिवार (दि. ५ नोव्हेंबर) रोजी रात्री १२ ते १ चे दरम्यान बिबट्याने अचानक हल्ला केला. यामधे मेंढपाळ गजानन बरकडे यांची एक मेंढी जागीच ठार झाली असुन, एक मेंढी जखमी झाली आहे.

मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर बरकडे व कुटुंबियांनी पाहीले तर बिबट्याने एका मेंढीचा फडशा पाडत ठार केले तर, एक मेंढी जखमी झाली होती. बरकडे कुटुंबिय वेळीच जागे झाल्यामुळे बाकीच्या मेंढ्या वाचल्या. अन्यतः मोठी नुकसान झाली असती.

वडगाव गुंड शिवारात सत्यवान गुंड यांचे शेतामधे गजानन बरकडे यांचा वाडा बसला होता. गरीब अडाणी मेंढपाळाने शेजार्याच्या फोनवरुन घटनेची माहिती निघोज (वडगांव गुंड) चे ग्रामपंचायत सदस्य शंकर गुंड यांना फोनद्वारे कळविली. ग्रामपंचायत सदस्य शंकर गुंड यांनी तात्काळ वन विभागाचे वनमजुर पाडळे यांच्याशी संपर्क केला. सदर घटनेचा पंचनामा करण्यास कळविले. सकाळी येतो असे म्हणालेले पाडळे इकडे आलेच नाही असे शंकर गुंड म्हणाले.

गरीब मेंढपाळाला कुणी वाली नाही. तो गरीब आहे म्हणुन कुणीही दखल घेत नाही. ग्रामपंचायतचा एक जबाबदार सदस्य यांना फोन करुन कळवतो तरीसुध्दा वनविभागाला ना घटनेचे गांभीर्य, ना काळजी. तसा सदर परीसरामधे बिबट्याचा वावर नेहमीच असुन, यापूर्वीसुध्दा शिरसुले येथे बिबट्याने शेळी ठार केली. तिथेही वनविभागाचे कुणीही फिरकले नाही.

ति घटना ताजी असतानाच आता हि दुसरी घटना घडली असुन, तेव्हासुध्दा वन विभागाचे कुणीही अधिकारी, कर्मचारी पंचनामा करण्यास आलेले नाहीत. घटना घडुन २४ तास झाले मेंढपाळ वाडा घेवुन दूसर्या गावात गेला. तरीसुध्दा वनविभागाचे कुणीही अधिकारी वा कर्मचारी इकडे फिरकलेच नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य शंकर गुंड यांनी सांगीतले.

आज जनावरांवर हल्ला होतोय उद्या माणसांवर हल्ला होवु शकतो त्यावेळीसुध्दा वनविभाग असेच वागेल का..? असा सवाल मला पडल्याचे गुंड म्हणाले. त्यानंतर इतरांनी वनपरीक्षेत्र अधिकारी सिमा गोरे, वनरक्षक खराडे यांना अनेकदा फोन केले. तरीसुध्दा कुणीही फोन उचलला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com