
अळकुटी (वार्ताहर)
पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे बिबट्यांनी 10 शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी (दि.10) मध्यरात्री घडली. यामुळे लोणीमावळा परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाललेे आहे.
याबाबतची माहिती अशी की, लोणी मावळा येथील पडवळ मळा येथील लोणीमावळा गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळासाहेब तुकाराम शेंडकर यांच्या दहा शेळ्या घरांमध्ये बांधलेल्या होत्या. रात्री सुमारे बारा ते एकच्या दरम्यान घराच्या भिंतीच्या मोकळ्या असलेल्या वरच्या बाजूने उडी घेऊन बिबट्याने पडक्याघरामध्ये प्रवेश केला.
घरामध्ये बांधण्यात आलेल्या सर्व दहा शेळ्यांचा फरश्या पाडला. बिबट्याने सर्व शेळ्यांच्या नरड्याला चावा घेऊन शेळ्या मारून टाकल्या. रात्री वारा पाऊस व विजेचा कडकडाट असल्यानेे घरातील मंडळींना शेळ्यांचा आवाज आला नाही. सकाळी उठल्यावर शेळ्या बाहेर बांधण्याकरता घरातील महिला घराशेजारील पडक्या घरामध्ये गेल्या तेव्हा शेळ्या मरून पडल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या बाबतची माहिती सरपंच वंदना सुभाष मावळे व सामाजिक कार्यकर्ते देवराज शेंडकर यांनी वन विभागास दिली. वन विभागाचे अधिकारी हरिभाऊ आठरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जागेचा पंचनामा केला.
या बिबट्यांचे भीतीने परिसरात घाबरटीचे वातावरण निर्माण झालेले असून वन विभागाने या परिसरात असलेले असलेला बिबट्या व त्याची मादी व दोन पिल्ले पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी लोणी मावळा गावचे चेअरमन स्वप्निल मावळे व संतोष शेंडकर यांनी केली.