बिबट्याच्या मुक्त संचाराने जेऊर कुंभारी परिसरातील जनजीवन विस्कळीत

बिबट्याच्या मुक्त संचाराने जेऊर कुंभारी परिसरातील जनजीवन विस्कळीत

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रात्री 12.30 वा. शंकर भिकाजी वक्ते यांनी आपल्या अंगणात बिबट्या बघितला. ही बातमी वार्‍यासारखी संपूर्ण गावभर झाली. त्यामुळे रात्रीच्यावेळी घराबाहेर कोणी निघायला तयार नाही. मागील आठवड्यात महेंद्र वक्ते, नानासाहेब गुरसळ यांनी उसाला पाणी भरत असताना तसेच काशिनाथ वक्ते यांनी आपल्या पोल्ट्री फार्मजवळ बिबट्या बघितला. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात कातकडे वस्ती येथे बिबट्याने शेळी फस्त केली.

त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. यासंदर्भात पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, अखिल भारतीय सरपंच महासंघाचे तालुकाध्यक्ष जालिंदर चव्हाण, यशवंतराव आव्हाड, कल्याणराव गुरसळ, महेंद्र वक्ते यांनी देखील वेळोवेळी वनविभागाला यासंदर्भात कल्पना देऊनही वनविभाग अधिकार्‍यांनी याकडे फारसे गांभिर्याने घेतले नाही.

शेतकर्‍यांना आपली शेती पडीक ठेवल्याशिवाय पर्याय नाही. शेतमजूर देखील शेतात काम करण्यास तयार नाहीत. रात्रीच्या वेळी घराबाहेर कोणी पडत नाही. भितीने गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेव्हा जेऊर कुंभारी परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com