सोनेवाडी परिसरात बिबट्याचा वावर! प्रवाशांना झाले दर्शन, पाहा VIDEO

सोनेवाडी परिसरात बिबट्याचा वावर! प्रवाशांना झाले दर्शन, पाहा VIDEO

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील प्रवासी कामानिमित्त संगमनेर येथे जात असताना सकाळी सात वाजता सोनेवाडी पोहेगाव शिवारालगत सावळीविहीर रांजणगाव देशमुख बायपास रस्त्यावर पंचकेश्वर मंदिराच्या बाजूला धबा रस्ता धरून बसलेला बिबट्या आडवा आला. मात्र चारचाकी गाडी असल्याने बिबट्याने त्यांच्यावर चाल केली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सकाळी सात वाजता कामानिमित्त सोनेवाडी येथील गिताराम जावळे, डॉ रावसाहेब जावळे, दादासाहेब जावळे, श्रीकांत जावळे, ज्ञानेश्वर विघे हे आपल्या चार चाकी गाडीतून संगमनेर येथे जात होते. पंचकेश्वर शिवारात त्यांना बिबट्या धबा धरून बसला असल्याचे दिसून आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपली गाडी १०० फुटावरच उभी केली. दादासाहेब जावळे यांनी या बिबट्याचे व्हिडिओ चित्रण केले.

गाडी उभी असताना समोरून डोऱ्हाळे मार्गे गावातीलच अतुल लांडगे हे मोटरसायकल वरून येत असताना जोर जोरात आवाज देऊन जावळे यांनी त्यांना सावध केले. आपल्या गाडीचा हॉर्न जोर जोरात वाजवल्याने या बिबट्याने रस्ता क्रॉस करून तिथून पळ काढला. या परिसरात गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. वन विभागालाही याबाबत कल्पना दिली आहे. मात्र वन विभागाचे बिबट्या जेरबंद करण्याचे प्रयत्न अनेक वेळा असफल राहिले आहे.

या बिबट्याने परिसरात मोठा धुमाकूळ घातला असून अनेक शेळ्या मेंढ्या वासरे गाई कोंबडी कुत्री खाऊन फस्त केली आहे. रात्री तर सोडा दिवसा देखील या परिसरात एकटे दुखटे माणसे फिरताना दिसत नाही. या बिबट्याच्या दहशतीने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बिबट्याचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा बिबट्या जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरे लावावे अशी मागणी गिताराम जावळे, डॉ रावसाहेब जावळे, दादासाहेब जावळे, श्रीकांत जावळे, ज्ञानेश्वर विघे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com