... तो बिबट्या की तरस ?

नागरिकांमध्ये संभ्रम
... तो बिबट्या की तरस ?

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) पोहेगाव (Pohegav), चांदेकसारे (Chadeksare), सोनेवाडी (Sonewadi) परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून बिबट्याची दहशत (Terror of Leopards) पसरली असून काही नागरिकांनी हा बिबट्या (Leopard) आहे की तरस असा प्रश्न उपस्थित करून संभ्रम निर्माण केला आहे.

तो बिबट्या (Leopard) असो किंवा तरस (Hyenas) शेळी (Goat), कुत्र्यांचा मात्र जीव जातोय. वन विभागास (Forest Department) याबाबत अनेकांनी माहिती दिली मात्र या हिंस्र वन्य प्राण्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग (Forest Department) अजूनही पुढे आले नाही. याकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.

सोनेवाडी (Sonewadi) परिसरात गेल्या आठवडाभरात भगवान राऊत, जनार्धन राऊत, मोहन जावळे यांच्या गोठ्यातील शेळ्यांसह सोनेवाडी (Sonewadi) गावातही भर लोकवस्तीतील कुत्री व शेळ्या या प्राण्याने ठार करून फस्त केल्या आहे. वन विभागाच्या (Forest Department) अधिकार्‍यांना याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन मृत शेळ्यांचा पंचनामा केला. मात्र या हिंस्र प्राण्याला जेरबंद करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या शेतात कांदा (Onion), ऊस (Sugarcane) व भाजीपाला सारखीपिके घेतली आहे. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळत आहे. त्यामुळे वनविभागाने या प्राण्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com