जोर्वेत बिबट्याचा मुक्तसंचार

जोर्वे |वार्ताहर| Jorve

तालुक्यातील जोर्वे शिवारात (Jorve Shivar) काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा (Leopards) मुक्तसंचार झाल्याने नागरिक भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदीपात्रालगत (Pravara River) असलेल्या बागायत पट्ट्यामध्ये ऊसाचे (sugarcane)मोठ्या प्रमाणावर मळे आहेत. याच ऊसामध्ये बिबट्याचे आता वास्तव्य सुरु असून त्यांचे दर्शन नागरिकांना होवू लागले आहे. गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जोर्वे - रहिमपूर रस्त्यावरील (Jorve-Rahimpur Road) बोरकर वस्तीकडे (Borkar Vasti) जाणार्‍या रस्त्यावर बिबट्याचा संचार सुरु होता. त्याचवेळी प्रकाश काकड हे रहिमपूरकडून जोर्वे येथे येत होते.

तसेच त्यावेळेस त्यांना रस्त्यात अचानक तीन बिबटे दिसले. त्यानंतर काकड यांनी आपली चारचाकी (Four Wheeler) थांबवून वाहनाच्या प्रकाशात पाहिले असता बिबटे रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात गेले. काकड हे तेथून पुढे जात जोर्वेत आले. तेथे त्यांनी मित्रांना सांगितले. यानंतर त्याच चारचाकीमध्ये काकड यांच्यासह चौघे जण बसून पुन्हा बिबट्या पाहण्यास गेले. तेव्हा एक मादी बिबट्या त्यांना रस्त्यावर उभा दिसला.

दरम्यान, या परिसरात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. तसेच अनेकदा बिबट्याने पशुधनासह मानवावरही हल्ले (Attacks) केल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) या परिसरात पिंजरा (Cage) लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com