राहुरी (Rahuri)

तालुक्यातील कोंढवड येथे विहिरीत पडलेला बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंध करण्यात वनविभागाला यश आले आहे.

कोंढवड येथील शेतकरी गणेश मोरे हे शेतकरी विहीरीवर मोटरीचे काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या शेतकऱ्यांने बिबट्याला हुलकावणी दिल्याने बिबट्या विहीरीत पडला होता.
.शेतकऱ्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात बिबट्या पडला विहिरीत .
त्यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा उपलब्ध करून बिबट्याला सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुखरूप बाहेर काढून जेरबंध केले.