पाण्याच्या टाकीत पडुन बिबट्याचा मृत्यु; परीसरात खळबळ

पाण्याच्या टाकीत पडुन बिबट्याचा मृत्यु; परीसरात खळबळ

अकोले | प्रतिनिधी

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या (bhandardara dam) परीसरात पाण्याच्या टाकीत पडुन एका तीन वर्षीय बिबट्याचा दुदैवी मृत्यु झाला आहे. बिबट्याच्या (leopard) मृत्यने परीसरात खळबळ उडाली आहे.

पाण्याच्या टाकीत पडुन बिबट्याचा मृत्यु; परीसरात खळबळ
कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून

अकोले (akole) तालुक्यातील पिंपळाची वाडी (pimpalachi wadi) येथे एका शेतक-याच्या शेतात पाटबंधारे विभागाच्या पाण्याच्या टाकीत तीन वर्षीय बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. ही पाण्याची टाकी पांटबंधारे विभागाची असुन याद्वारे परीसरातील शेतक-यांना शेतासाठी पाणी वाटप केले जाते. जमिनीपासुन एक मिटर ही टाकी उंच असुन मोठ्या प्रमाणात खोल आहे.

टाकीजवळच कोंबड्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसुन येत असुन हा बिबट्या टाकीवर खेळता खेळता किंवा सावजाचा पाठलाग करताना पडला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बिबट्याला पाण्याच्या टाकीच्या वर चढणे शक्य झाले नसावे.

पाण्याच्या टाकीत पडुन बिबट्याचा मृत्यु; परीसरात खळबळ
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

परीसरातील हभप एकनाथ महाराज भांगरे यांनी या घटनेची माहीती प्रादेशिक वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी संदीप पाटील यांना दुरध्वनीवरुन दिल्यानंतर तात्काळ राजुर कार्यालयास सदर घटनेची माहीती कळविण्यात आली.

राजुर कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांच्या अधिपत्याखाली वनपरीमंडळ अधिकारी मधुकर चव्हाण, वनरक्षक बहिरु बेनके, शंकर बेणके, बाळु उघडे, रघुनाथ धादवड, विठ्ठल गभाले, भिमा बांडे यांनी जागेवर जाऊन पंचनामा करत गुन्हा दाखल करुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पाण्याच्या टाकीत पडुन बिबट्याचा मृत्यु; परीसरात खळबळ
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

या बिबट्याच्या मृतदेहाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी संदीप पाटील यांच्या आदेशानुसार राजुर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात शवविच्छेदन करत मृतदेहाला अग्निडाग देण्यात आला.

पाण्याच्या टाकीत पडुन बिबट्याचा मृत्यु; परीसरात खळबळ
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

Related Stories

No stories found.