
कोल्हापुर | Kolhapur
नगर पुणे महामार्गावर पळवे शिवारातील हाँटेल सह्याद्री जवळ अज्ञात वहानाच्या धडकेने शुक्रवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान बिबट्याचा मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे, साहायक निरिक्षक पोलिस तुळशीराम पवार, रमेश शिंदे सह पोलिस पथक घटना स्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत पंचनामा करण्यासाठी वन विभागाला कळवले आहे. यावेळी वन विभागाचे संदिप भोसले , उमाताई केंद्रे, बाळू पाचरने बंडू गोरे, काशीनाथ पठारे सुखदेव गोरे आदी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले व त्यांनी वन विभागाच्या गाडी मधून सदर मयत बिबट्या पुढील सोयस्कर पार पाडण्यासाठी ताब्यात घेतले अशे पोलिस सूत्रांनी सांगितले.