कोल्हारमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा बिबट्या जेरबंद

कोल्हारमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा बिबट्या जेरबंद

कोल्हार l वार्ताहर

कोल्हार बुद्रुक येथे पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाजवळ खर्डे यांच्या वस्तीवर रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंदाजे ६ वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. एका महिन्याच्या कालावधीत एकाच जागी दुसऱ्यांदा बिबट्या जेरबंद झाला.

याअगोदर दि. २० ऑगस्ट रोजी नर जातीचा बिबट्या पिंजर्‍यात अडकला होता. त्यानंतरही आणखी बिबटे या परिसरात असल्या कारणाने याठिकाणी पिंजरा ठेवण्यात आला. त्यामध्ये शेळीचे सावज ठेवण्यात आले. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या बिबट्याचे आणखी २ बछडे या भागातील नागरिकांना दृष्टीपथास पडले असल्याचे त्यांनी सांगितले.

बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कोपरगाव वनविभागास देण्यात आली. सोमवारी सकाळी वनरक्षक संजय साखरे, वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यास लोणी येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिकेत नेले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करून बिबट्यास जुन्नर येथील बिवट निवारक केंद्र येथे निसर्गाच्या सानिध्यात सोडले जाणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com