
आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी (Rahuri) तालुक्याच्या पुर्व भागातील आरडगाव (Aradgav) शिवारात वन विभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजर्यात एका मादी बिबट्यासह (Leopard) दोन बछडे जेरबंद झाले आहेत. या बिबट्याला (Leopard) बघण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून आरडगाव (Aradgav) शिवारात म्हसे वस्ती परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. शेळ्या-कोंबड्या फस्त केल्या होत्या. या परीसरात बिबट्याचा (Leopard) मुक्त संचार असल्याने सोमवारी भरदुपारी बाबासाहेब एकनाथ झुगे हे शेतकरी शेताला पाणी देत असताना त्यांना बिबट्याची मादी पाच बछड्यांसह दिसली. परिसरातील राहुल काळे, दादासाहेब काळे, राजेंद्र काळे, सुभाष काळे, ओमकार झुगे किशोर झुगे, चंद्रकांत काळे, राजु म्हसे यांनी या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे माहिती दिली. त्यांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती कळवत पिंजरा लावण्याची मागणी केली.
त्यानुसार वनविभागाने पिंजरा (Forest Department Cage) उपलब्ध करून देत मंगळवारी सायंकाळी पाच पिल्लांपैकी दोन पिल्ले पकडण्यामध्ये वन विभागाला यश आले. तर तीन बछड्यांनी अंधारात धूम ठोकली. मादी बिबट्या (Leopard) व दोन पिल्लासह पिंजर्यात जेरबंद झाल्याने शेतकर्यांची भिती थोडी कमी झाली. मात्र, अजून तीन बछडे मुक्त असल्याने दहशत कायम आहे. यासाठी पुन्हा पिंजरा (Cage) लावण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.