
वळण |वार्ताहर| Valan
राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले (Leopard Attack) होत असतानाच आता मोकाट सुटलेल्या बिबट्यांनी (Leopard) मानवी जिवांनाही लक्ष्य केले आहे. शुक्रवारी राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) वळण (Valan) येथील चार तरूण दुचाकीवरून वळणहून पश्चिमेकडील चिंचाळे (Chichale) गावाकडे गेले. तेथून सायंकाळच्या सुमारास परतत असताना त्यांच्यावर रात्री दहाच्या सुमारास बारागाव नांदूर (Baragav Nandur) परिसरातील घाटात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) दुचाकीवर झेप घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे (Attack) हे तरूण दुचाकीवरून खाली पडले. मात्र, त्याचवेळी पाठीमागून दुसरी दुचाकी आल्याने बिबट्याने (Leopard) तेथून पलायन केल्याने ते चारही तरूण बिबट्याच्या हल्ल्यातून (Leopard Attack) बालंबाल बचावले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) बिबट्यांनी (Leopad) धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पिंजरा बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, संबंधित वनखात्याच्या अधिकार्यांनी त्याकडे दुर्लक्ष (Ignore) केल्याने शेतकर्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वळण (Valan) येथील रुपेश ठाकर, बंटी जाधव, शनिश्वर ठाकर, संजय ठाकर हे तरूण बहिणीच्या गावाला चिंचाळा या गावी गेले असता तेथे कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर चिंचाळ्यावरून वळणला येताना रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने (Leopard) बारागाव नांदूरजवळ (Baragav Nandur) घाटामध्ये अचानक त्यांच्या दुचाकीवर उडी मारली. ते अचानक खाली पडले. त्यानंतर लगेच मागून दुसरी दुचाकी आल्यानंतर त्याच्या प्रकाशाने बिबट्याने (Leopard) तेथून पलायन केले. रुपेश ठाकर म्हणाले, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा आम्हाला प्रत्यक्षात अनुभव आला. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राहुरी तालुक्यात बिबट्यांचा मोठा उपद्रव वाढला आहे. राहुरीच्या पूर्वभागातही बिबट्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मागील आठवड्यात मानोरी परिसरात बिबट्यांनी सुमारे चारवेळा पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे आता शेतकरीही भयभीत झाले आहेत. त्यातच आता बिबट्यांनी माणसांना लक्ष्य केल्याने दहशत वाढली आहे.